केनियाच्या किलिफी काऊंटी क्षेत्रातील शाकाहोला गावातील जंगलाच्या परिसरातील गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा फादर मैकेंजी नथेंग. येशूला भेटलात की, तुमची दुःख दूर होतील, असे पाद्री मैकेंजी नथेंग लोकांना सांगू लागला. आपले जीवन सुखी करण्यासाठी सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूला भेटायलाच व्हावे, असे प्रवचन ऐकणार्या त्या बिचार्या गरीब श्रद्धाळूंना वाटू लागले. पाद्री मैकेंजी नथेंगने सांगितले, ”उपवास करा, तुमचा उपवास त्यातून होणार्या वेदना, हे सगळे पाहून प्रत्यक्ष जिझस क्राईस्ट येशूला दया येईल आणि तो तुम्हाला भेटेल.” येशूला भेटण्याची तीव्र इच्छा असणार्या त्या अबालवृद्धांनी उपवास करायला सुरुवात केली. उपवास करत राहायचा. करत राहायचा. पाद्री मैकेंजीने सांगितल्याप्रमाणे,एक ना एक दिवस येशूला दया येईल आणि तो आपल्याला भेटायला येईलच, या भाबड्या आशेत लोक दिवसेंदिवस उपवास करू लागले. पण, अन्नत्यागाने शरीर दुर्बल होऊन ते मृत्युमुखी पडले. एक-दोन नव्हे, तर 90 लोकांचे मृतदेह शाकाहोला गावच्या जंगलात सापडले. हा आकडा आणखीन वाढू शकतो. लोकांना अंधश्रद्धेचा बळी बनवणार्या पाद्री मैकेंजी नथेंग यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र, मैकेंजीचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपूर्वीच त्याचे गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च बंद झाले होते. त्याचे म्हणणे, त्याने लोकांना येशूभेटीचे महात्म्य सांगितले होते.
असो. काही महिन्यांपूर्वीच दोन बालकांनी अन्नत्याग करून असाच जीव गमावला हेाता. त्यांनाही पाद्री मैकेंजीने येशूला भेटवून देण्याचे वचन दिले होते म्हणे. या दोन बालकांच्या पालकांनी मैकेंजीविरोधात कायदेशीर कारवाई केली. तो काही काळ तुरुंगात राहिला आणि एक लाख केनियन शिलिंग (700 डॉलर) वर त्याला जामीन मिळाला. तो तुरुंगातून बाहेरही आला. चर्चच्या पाद्रीने काही म्हणावे आणि लोकांनी असा अंधविश्वास ठेवून सरळ सरळ आत्महत्येचा मार्ग पकडावा?
लोक मैकेंजीच्या खोटारडेपणालाही धार्मिक सत्य का मानत होते? कारण, केनिया हा आफ्रिकेतील एक गरीब देश. देशाची अर्धी लोकंसख्या दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारी. गरिबी, गरिबीतून येणारे भौतिक दुःख, अन्नान्न दशा, लाचारी आणि नकोसे असलेले जगणे आणि काहीतरी चमत्कार व्हावा, आपण सुखी व्हावे, आपल्या सार्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रचंड इच्छा असलेेलेहे सगळे लोक. आपले भले करणारे कुणी नाही, कदाचित देवच आपले भले करू शकतो, अशी यांची आशा. त्यामुळे पाद्री मैकेंजी येशूला भेट घडवून आणण्यसाठी उपाशी राहायला सांगतो, तर उपाशी राहू, असे या लोकांनी ठरवले. अज्ञान अंधश्रद्धेची परिसीमाच!
आफ्रिकेतील हा देश गरीब, मागासलेला आहे, असे समजून तर काही वर्षांपूर्वी ह्युस्टन, अमेरिका येथेही एक घटना घडली होती. एका सधन अमेरिकन महिला आपल्या तीन लहान मुलांसमवेत कारमध्ये बसली. त्यानंतर तिने कारला आतून आग लावली. का? तर वेदनेने तडपडून ती आणि तिची मूल मेली तर तिला येशू भेटला असता असा तिचा दावा. काही लोकांचे म्हणणे आहे की, बहुसंख्य ख्रिस्ती श्रद्धाळूंचा येशू आणि लाजर या कथेवर विश्वास आहे. त्यानुसार एक दिवस लाजर खूप आजारी पडतो आणि मरतो. त्यावेळी येशू तिथे नसतो. मारिया आणि मार्था येशूला विनवणी करतात की तू लाजरला पुन्हा जीवंत कर. येशू मृत लाजरला आवाज देतो लाजर बाहेर ये आणि काय आश्चर्य लाजर कपनासकट जीवंत होऊन बाहेर येतो. येशू ख्रिस्ताच्या चमत्काराची ही सर्वात लोकप्रिय कथा. या कथेवर आजही जगभरातले ख्रिस्ती लोक नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. त्यामुळे आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याचा ध्यास घेऊन मेलो, तर तो आपल्याला जीवंत करेल, असा विश्वास बहुसंख्य लोकांना वाटतो. हाच विश्वास मैकोंजीनेही या निष्पाप भोळ्या भाबड्या श्रद्धाळूंना दिला का? केनियाच्या एका समाजगटाने तर जाहीरच केले की चर्च आणि येशूश्रद्धा या केनिया देशाच्या कायद्याच्या कक्षेत नाहीत. काय म्हणावे श्रद्धा अंधश्रद्धा ही ज्याच्या त्याच्या दृष्टी अनुभवावर असते. पण केनियातील या निष्पाप लोकांचा बळी चर्च फादरी आणि प्रवचन यावर प्रश्नचिन्ह उमटवत आहे. पृथ्वी गोल की चपटी यावर बायबलचा हवाला कधी काळी चर्चने दिला होता. आता केनियाच्या घटनेवर चर्चसंस्था काय म्हणेल?