काँग्रेसचे आशिष देशमुख बावनकुळेंच्या भेटीला; नानांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!
24-Apr-2023
Total Views |
मुंबई : "काँग्रेसचा बडा नेता मंगळवारी पक्षप्रवेश करेल." असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. देशमुख यांनी आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नागपूरमधील कोराडी येथील बावनकुळेंच्या निवासस्थानी ही भेट घडली.
या भेटीवर काँग्रेसचे नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणं टाळल आहे. पटोले म्हणाले, "मला त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे कोणी भाजपच्या विरोधात राजकीय दल असतील त्यांना सोबत घेऊन एकत्रित लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही काही लोकं जोडलेली आहेत जे आमच्या सोबत आहेत. त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण आज देशात संविधान आणि लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. देशातला शेतकरी उध्वस्त केला जातोय. देशातला तरुण पिढीला उध्वस्त केल जात आहे."
"छगन भुजबळ बोलले की मुख्यमंत्री बदलेल सरकार पडेल. महाराष्ट्रामध्ये जी काही अस्थिरता आहे त्या अस्थिरतेच्या आधारावर ते म्हणाले असतील, कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आता अपेक्षित आहे आणि त्या आधारावर महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आशिष देशमुख यांनी बावनकुळेंची घरी भेट घेतली आहे. मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही." असं नाना पटोले म्हणाले.