मुंबई : आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पाहायला मिळते. त्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या दिवशी सोनेखरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईत सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे.
आजच्या बाजारभावानुसार, २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम आजचा भाव ६०,८२० रुपये आहे तर २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ५५,७५० रुपये आहेत. तर मुंबईत चांदीचा भाव आज ७०० रुपयांनी झाले आहेत. आज किलोमागे चांदीचे दर ७६,९०० रुपये आहेत.