पुणे : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या ‘सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन’ आणि ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ’सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, ’हिंदुजा ग्रुप’चे शोम हिंदुजा आदी उपस्थित होते. उद्योग व सामाजिक क्षेत्रातील 200पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.
समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच 2000 पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी ’लर्न व्हाईल अर्न’ अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व संगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.