अनुराग ठाकूर यांचा तिसऱ्यांदा कल्याण दौरा

भाजपच्या विधानसभा निहाय बैठका सुरु

    21-Apr-2023
Total Views |
anurag thakur

कल्याण
: भाजपने राज्यातील लोकसभेच्या ४५ जागा मिळविण्याकरीता आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर कल्याण लोकसभेसह अन्य लोकसभांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात लवकरच दौरा होणार आहे. त्यांचा हा तिसरा दौरा आहे.‌ त्यासाठी भाजपने विधानसभा निहाय बैठका घेणे सुरु केले आहे.

कल्याण पूर्व भागात शुक्रवारी भाजपची बैठक पार पडली. या बैठकीस भाजपचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघासह कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभेत भाजप बैठका घेणार आहे. यापूर्वी क्रिडा मंत्री ठाकूर यांचे कल्याण डोंबिवलीत दोन दौर पार पडले आहे. तिसरा दौरा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पार पडणार होता. मात्र दौ:या पूर्वी भाजपची तयारी झाली नसल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. हा दौरा आत्ता एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणे अपेक्षित आहे.