अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा ; २१ जणांचा मृत्यू

    02-Apr-2023
Total Views |
united-states-21-killed-in-horrific-tornadoe-in-different-parts-of-america
 
नवी दिल्ली : अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे. या वादळाने अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात पुन्हा कहर केलाय. देशातील विविध भागात भीषण वादळ आणि चक्रीवादळामुळं २१ जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक लोक जखमीदेखील झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.त्याचबरोबर प्रशासनाकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच, पीडितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

युनायटेड स्टेट्सच्या दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागांमध्ये विनाशकारी वादळानं दि. ३१ मार्च रोजी कहर केला.इलिनॉयमध्ये या उद्रेकात आणखी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वादळातील मृतांची संख्या २१ झाली आहे. तसेच देशात वेगवेगळ्या ठिकाणी ६० हून अधिक चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.