कोलकत्ता : रामकृष्ण मठ आणि मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचं दि.१ एप्रिल रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास सेवा प्रतिष्ठान, कोलकाता येथे निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते.स्वामी प्रभानंदांचे पार्थिवावर दि. २ एप्रिलला रात्री ८ वाजेपर्यत बेलूर मठात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. स्वामी प्रभानंद यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया रात्री ९ वाजता सुरू होणार ,असे मिशनने म्हटले आहे.स्वामी प्रभानंद यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३१ रोजी अखौरा येथे झाला.
स्वामी प्रभानंद १९५८ मध्ये नरेंद्रपूर केंद्रातील रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले आणि १९६६ मध्ये त्यांना स्वामी वीरेश्वरानंदजी महाराज यांच्याकडून 'संन्यास दीक्षा' मिळाली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी प्रभानंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराजांचं जीवन आणि शिकवणी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, असं ट्विट त्यांनी केलंय.