हिंदू व्यापाऱ्यांना वाकड्या नजरेने पाहिले, तर डोळे जाग्यावर ठेवणार नाही!

- अहमदनगर जाळपोळ प्रकरणी आमदार नितेश राणेंचा इशारा

    19-Apr-2023
Total Views |

Nitesh Rane
 
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील व्यापऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. हिंदू व्यापाऱ्यांवर नाहक हल्ले केले जात आहे. कायदा-सुव्यवस्थाही बिघडत चालली होती.
 
 
Nitesh Rane
 
यापुढे हिंदू व्यापाऱ्यांना वाकड्या नजरेने पाहिले, तर डोळे जाग्यावर ठेवणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी व्यापाऱ्यांना भेट देत, व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
 

Nitesh Rane
 
 
गजराजनगर जाळपोळ, रामवाडी मारहाण प्रकरण, बार्शीकर कुटुंबियांवरील हल्ला, कांदा व्यापारी व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेत घटनेतील पीडितांची भेट घेतली.
 
 
Nitesh Rane
 
 
यावेळी नितेश राणे म्हणाले, "पोलिसांना एकच सांगतो सरकार बदलेले आहे. आता ना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहे. ना पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ आहे. कायद्याचे राज्य आहे.” शिवाय, इथल्या परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोचवली जाणार आहे. अशी माहिती राणेंनी दिली.
 

Nitesh Rane