पुणे : जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट झाला असून जिल्हा परिषदेने सर्वेक्षण करून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे, या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेऊन देऊन नये, असे आवाहन परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
शासनाची कोणत्याही प्रकारची मान्यता न घेता या शाळा चालविल्या जात होत्या. दौंड तालुक्यातील मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, कासुर्डी येथील क्रियांश प्री प्रायमरी स्कूल, बेटवाडी येथील के. के. इंटरनॅशनल स्कूल, हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हेवाडी येथील क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल, खडकवासला येथील किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोर येथील पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, खेडमधील भोसे येथील जय हिंद पब्लिक स्कूल, बावधन येथील एसएनबीपी टेक्नो स्कूल, मुळशी तालुक्यातील जांभे येथील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, नेरे येथील साई बालाजी पब्लिक स्कूल, पुरंदर तालुक्यातील वीर गावातील श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल या त्या अनधिकृत शाळा आहेत.