अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत घेतला वडापावचा आस्वाद
18-Apr-2023
Total Views |
मुंबई : अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्यावेळी त्यांनी आर्थिक राजधानी मुंबईला भेट दिली. टीम कुक यांच्या दौऱ्यात मुंबईत अॅपल स्टोरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी टीम कुक यांची भेट घेतली. माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या मुंबई भेटीदरम्यान, माधुरी दीक्षित यांनी टीम कुक यांना मुंबईचा प्रसिध्द खाद्यपदार्थ वडापाव खाऊ घातला. आणि मुंबईत टीम कुक यांचं स्वागत केलं. या दोघांत चर्चा झाल्याचे दिसून आले.