द्रमुक सरकारला नमवले! रा.स्व.संघाचे भव्य पथसंचलन

    17-Apr-2023
Total Views |
rss-rally-in-tamil-nadu-45-places-after-supreme-court-order-dmk-mk-stalin-govt

चेन्नई : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ने दि.१६ एप्रिल रोजी तामिळनाडूच्या ४५ भागात भव्य रोड शो अयोजित केली होती. याआधी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने राज्यात रा.स्व.संघाच्या या कार्यक्रमावर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रोड शोचा मार्ग मोकळा झाला . तसेच कडक सुरक्षा व्यवस्थेत स्वयंसेवकांनी ढोल आणि काठ्यांचा उपयोग करून परेडदेखील केली.

चेन्नई, वेल्लोर, होसूर, सालेम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, अरणी, कोईम्बतूर, मेट्टुपलायम, पल्लडम, करूर, तेनकासी, कन्याकुमारी, तिरुचुपल्ली आणि मदुराई या प्रमुख भागातून रा.स्व.संघाच्या पथसंचलनचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तमिळनाडूची राजधानी चेन्नईच्या कोरत्तूर भागातही एक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डीएल मुरुगन यांनीही सहभाग घेतला होता. यानंतर त्यांनी मोठ्या जाहीर सभेलाही संबोधित केले.

मात्र या रॅलीच्या आयोजनासाठी रा.स्व.संघाला तामिळनाडूच्या द्रमुक सरकारशी दीर्घ लढा द्यावा लागला होता. प्रथम मद्रास उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या विरोधात आणि रा.स्व.संघाच्या बाजूने निकाल दिला. रा.स्व.संघाच्या रॅलींमुळे अस्थिरता निर्माण होईल आणि व्यवस्थापन करणे कठीण होईल, असा राज्य सरकारने युक्तिवाद केला होता. मद्रास हायकोर्टाने बंद जागेत रॅली काढण्याची सूचना करूनही एमके स्टॅलिन यांचे सरकार ठाम राहिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने रा.स्व.संघाने तमिळनाडूतील ४५ ठिकाणी पथसंचलन केले.