ठाकरे गटाकडून उद्या मुंबईत मेळाव्याचे आयोजन

    15-Apr-2023
Total Views |
uddhav-thackeray-shivsanik-campaign-in-dadar

मुंबई
: शिवसेना ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे उद्या मुंबईत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दादरच्या शारदाश्रम शाळेत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्याचा ठाकरे गटाचा मेळावा हा विशेषकरुन
कोकणवासीयांसाठी असणार आहे. यात मुंबई, ठाणे, विरार या शहरातले शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची चिन्हे आहेत. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते उपस्थित असणार आहेत.