मोठी बातमी! जपानच्या पंतप्रधानांवर बॉम्ब हल्ला!

    15-Apr-2023
Total Views |
 
Fumio Kishida
 
 
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जपानमधील वाकायामा शहरात भाषणादरम्यान एका व्यक्तीने स्मोक बॉम्ब फेकल्याची धक्कादायक माहिती मिळते आहे. मात्र बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ‘द जपान टाईम्स’च्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते, त्याआधीच हा स्फोट झाला.
 
स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. या घटनेचा व्हिडीओ देखिल समोर आला आहे. या व्हिडीओत घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सभेत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते, असे सांगण्यात येत आहे.
 
फुमियो किशिदा २०२१ मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. त्यांनी २०१२ ते २०१७ पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि २०१७ मध्ये त्यांनी कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. २०१७ ते २०२० पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच किशिदा भारतात आले होते, भारतात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.