मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपले पती समीर यांच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दादर येथे चैत्य भूमीवर उपस्थिती लावली होती. यावेळी चाहत्यांनी आणि पत्रकारांनी त्यांना गराडा घातला व प्रश्न विचारात त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचाही आनंद लुटला.
यावेळी क्रांती म्हणाल्या, "माझे पती दरवर्षी येते येत परंतु, मी यावर्षी पहिल्यांदाच येत आहे. भीमदेवांची मी पूर्वीपासूनच भक्त आहे परंतु यापूर्वी येणे जमले नव्हते. आज मी खास इथे सून म्हणून आले आहे. तुम्हा सर्वची गर्दी पाहून मला अतिशय आणण होत आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वाना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"