मुंबई : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती आहेत. कदम हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये कैद आहेत.
सदानंद कदम यांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दापोली येथून कदम यांना साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली होती. कदम यांना 27 एप्रिलच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.