नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दि. १२ एप्रिल रोजी दिल्लीत जाणार होते. मात्र काही कारणाने त्यांना जाता आले नाही. पंरतू दि.१३ एप्रिल रोजी शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेच्या घरी दाखल झालेले आहेत. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गौतम अदानी यांच्यावर पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत पवारांची ही पहिलीच बैठक आहे.या बैठकीतून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. रात्री साडेआठ वाजता भेटी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होणार आहे.