'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा' समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन!

    12-Apr-2023
Total Views |
death-of-indias-oldest-billionaire-keshab-mahindra

नवी दिल्ली : भारतातील अब्जाधीश आणि आनंद महिंद्रा यांचे काका केशब महिंद्रा यांचे दि. १२ एप्रिल रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.इन्स्पेसचे अध्यक्ष पवन के गोयनका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये पवन गोयंका म्हणाले की, आज बिझनेस जगाने एका महान व्यक्तिमत्व, केशब महिंद्रा गमावले. केशब महिंद्रा यांना भेटून नेहमीच आनंद होत असे. व्यवसाय, अर्थकारण आणि सामाजिक गोष्टींची उत्तम प्रकारे सांगड घालण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती.
 

नुकतेच फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०२३ च्या अब्जाधीशांच्या यादीत केशब महिंद्रा यांचे नाव देखील समाविष्ट आहे. या यादीत १६ नवीन अब्जाधीशांसह त्यांचे नाव प्रथमच सामील करण्यात आले होते.महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे ४८ वर्षे अध्यक्ष राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी ते पद सोडले. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार केशब महिंद्रा यांच्याकडे $१.२ अब्ज संपत्ती होती.

कोण होते केशब महिंद्रा?

केशब महिंद्रा यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर १९४७ मध्ये महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाले. त्यानंतर १९६३ मध्ये ते या ग्रुपचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने नवीन उंची गाठली आणि त्यानंतर ४८ वर्षांच्या सेवेनंतर सन २०१२ मध्ये त्यांनी महिंद्राचे अध्यक्षपद त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवले. यासोबतच त्यांनी टाटा स्टील, सेल, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्यांमध्ये बोर्ड स्तरावर काम केले.

महिंद्रा समूहाला ५ दशकांच्या दीर्घ कार्यकाळात केशब महिंद्रा यांनी नव्या उंचीवर नेले होते. आजच्या काळात, Mahindra & Mahindra हे त्याच्या ट्रॅक्टर, SUV केसेस तसेच हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवांसाठी देखील ओळखले जाते. १९८७ मध्ये, व्यवसाय जगतात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना फ्रेंच सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. याशिवाय केशब महिंद्रा यांना Ernst and Young द्वारे २००७ साली जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.