उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना... "...कामाला लागा"
12-Apr-2023
Total Views |
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ११एप्रिल रोजी भेट झाली. उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असून मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं होतं. अशातच ही भेट राजकीय होणार असून महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचे समोर येत आहे.
खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी १२ एप्रिल रोजी झालेल्या ठाकरे-पवार भेटी मागील कारण सांगितलं आहे. राऊत बोलत असताना म्हणाले, "शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रदीर्घ अशी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. भविष्यातील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली, शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या." अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.