पारस येथील दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

    10-Apr-2023
Total Views |
tree-fell-in-the-temple-area

मुंबई
: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.