मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआयचा पहिला उपमहापौर : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या भव्य मेळाव्यात आरपीआयने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

    10-Apr-2023
Total Views |
 municipal elections in the grand gathering of Republican Party of Mumbai region

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे.मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजप चा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. ५ वर्षात पहिला अडीज वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय च्या उमेदवारांना ही निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

भाजप चे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ५ वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असे आश्वासन दिले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत असे सांगत आशिष शेलार यांनी ना.रामदास आठवले यांच्यावर कविता करीत सभेत रंगत आणली. २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ५०० फूटांचे घर देण्यात यावे तसेच खाजगी इमारतींना काल मर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरा सारखे प्राधिकरण असावे ; मुंबईत बंजारा भवन; कक्कया भवन बांधावे आशा विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.

यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, मुंबई उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा, अध्यक्ष स्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, स्वागताध्यक्ष साधू कटके, माजी मंत्री अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, संजय डोळसे, रमेश गायकवाड, संजय पवार, प्रकाश जाधव, विवेक गोविंदराव पवार, बाळासाहेब गरुड, अजित रणदिवे, सुनील बन्सी मोरे, सुमित वजाळे, विनोद निकाळजे, शिलाताई गांगुर्डे, कामु पवार, अमर कसबे, श्रीकांत भालेराव, रवी गायकवाड, बी के बर्वे, संजय भिडे, दयाळ बहादूर, ऍड आशा लांडगे, डॉ विजय मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.