मुंबई महापालिकांच्या रुग्णालयात मास्क अनिवार्य!

    10-Apr-2023
Total Views |
mumbai-corona-news-mask-compulsory-in-all-bmc-hospital

मुंबई
: देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने तयारी सुरू केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.तसेच मुंबई महापालिकांच्या रुग्णालयातदेखील दि.११ एप्रिलपासून मास्क वापरण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच ६५ वर्षावरील व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन ही महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दि.१० एप्रिल रोजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशभरात मॉकड्रील ही केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींच्या तयारीची चाचणी होणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे.