"दिल्लीत या तुमचाही मुसेवाला करू!", राऊतांना धमकी

    01-Apr-2023
Total Views |
shiv-sena-leader-sanjay-raut-receives-death-threat-message-from-lawrence-bishnoi-gang

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकी राऊतांना देण्यात आली. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आले आहे.

दरम्यान, संजय राऊत धमकीप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांजूर मार्ग पोलीस स्टेशनमधे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संजय राऊतांना धमकी आल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्याच्याबाबत अशी घटना घडणे दुर्दैवी आहे,असे ही सुप्रिया सुळे म्हणाले. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राऊतांना दारूच्या नशेत धमकी देण्यात आली अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही, असे ही फडणवीस म्हणाले.