नवी दिल्ली : अयोध्येत एकीकडे राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली आहे. बाबरी ढाँचा-रामजन्मभूमी निकालात सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन दिली होती, ज्यावर ’इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे मशीद, हॉस्पिटल, संशोधन संस्था, कम्युनिटी किचन आणि लायब्ररी बांधकाम करण्यात येणार आहे. जमिनीचा वापर बदलल्यामुळे विकास प्राधिकरणाकडे हा प्रश्न प्रलंबित होता.