वाडा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या निर्देशानुसार आज (ता.४) रोजी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात बुथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराज व दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले.
या सशक्तीकरण प्रशिक्षण वर्गाला प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महीला आघाडी,कृषी आघाडी,युवा मोर्चा, शक्तीकेंद्र प्रमुख, विस्तारक आदी अपेक्षित होते.
या प्रसंगी ठाणे ग्रामीणचे प्रभारी व जेष्ठ नेते बाबाजी काठोळे, उपजिल्हाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, मंडल प्रभारी प्रशांत संखे,जेष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, कृष्णा भोईर,मनिष देहेरकर, राजू दळवी, कुणाल साळवी, राजेश रिकामे, माजी. महीला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, माजी सभापती अश्विनी शेळके,जिल्हा महीला आघाडी उपाध्यक्ष अर्चना भोईर,महीला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष कांतीलाल गोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.