'त्या' दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?

- संदीप देशपांडेकडुन राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची आठवण

    31-Mar-2023
Total Views | 160
 
Raj Thackeray
 
 
मुंबई : राम नवमीच्या शुभदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तर, मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील राम नवमी शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. अशातच मनसेकडुन राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात राज ठाकरे भविष्यातल्या दंगलींच्यी शक्यता वर्तवत आहेत. हा व्हिडीओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे.
 
 
 
 
 
राज ठाकरे भाषणावेळी म्हणाले होते की, "आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर एकदा धाडी टाका, काय-काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. पाकिस्तानसारख्या शत्रूची आपल्याला गरजच नाही. उद्या जर काही घडलं, तर आतमधली परिस्थिती आवरता आवरता आपल्या नाकी नऊ येतील. इतक्या गोष्टी आत भरल्या आहेत. परंतु आपलं लक्ष नाही."
 
"अनेक मशिदी अशा आहेत, की ज्यांच्या आत काय सुरू आहे ते आपल्याला माहिती नाही, ही सगळी लोकं पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आले आहेत आणि आपण त्यांना स्वीकारलं आहे. आपल्या नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना याच्याशी काही देणंघेणं नाही. उलट आपले नेते यांना आधार कार्ड, शिधापत्रिका काढून देत असतात. आपलेच लोक त्यांना सर्वकाही पुरवतात. एक दिवस येईल जेव्हा सर्वांचे डोळे उघडतील." असं राज ठाकरे व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
 
"ऐका आणि स्वस्थ बसा." असे लिहीत संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121