रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न!

अजित पवारांबद्दल नरेश म्हस्केचा गौप्यस्फोट

    31-Mar-2023
Total Views |
ajit-pawar-called-many-people-to-defeat-rohit-pawar-in-mca-president-election-naresh-mhaske-claim

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा गौप्यस्फोट विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

८ जानेवारी २०२३ रोजी एमसीए अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रोहित पवार अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी स्वत: अजित पवार यांनी अनेकांना फोन केले, असा खळबळजनक आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवारांनी आधी घरातंल बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यावर टीका करा,असा सल्ला ही नरेश म्हस्के यांनी अजित पवारांना दिला आहे.