नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने बनावट ओळख वापरून जारी केलेले १५ लाख मोबाईल नंबर बंद करण्यात आलेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी दि. २९ मार्च रोजी दिली आहे. यावेळी केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
तसेच ऑनलाइन सायबर तक्रारींसाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १९३० जारी करण्यात आला आहे. 'भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने' १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायबर गुन्हे आणि फसवणूकी टाळण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या.त्यामुळे बनावट ओळख पत्राचा वापर करून मोबाईल नंबर घेणाऱ्यांना आणि सायबर गुन्हे करणाऱ्यांना आता आळा बसणार आहे.