मुंबई : पंतप्रधान अदानींना का वाचवतात? सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का? असा सवाल करत उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.
राऊत म्हणाले, "अदानी हा केवळ चेहरा, पैसा मोदी यांचा आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यात तथ्य आहे. मोदी मुख्यमंत्री असतानाच अदानीचा उदय झाला. दरम्यान, सध्या प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळतेय." असं म्हणण राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या पदवीवर टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. “केवढी अजब बाब आहे. गुलामीची जेव्हा सवय होते, तेव्हा प्रत्येकजण आपली खरी ताकद विसरतो.” असे लिहित एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक घोडा एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधून ठेवल्याचे दिसत आहे. त्याला "भारत माता की जय!" असे ही कॅप्शन देण्यात आले आहे.