अमेरिका हादरली! शाळेत महिलेचा अंदाधुंद गोळीबार, ३ शाळकरी मुलांसह ६ जण ठार

    28-Mar-2023
Total Views |
us-nashville-school-firing-six-killed-including-3-child


नॅशविल
: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीय. आता गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. नॅशविल शहरातील एका खासगी ख्रिश्चन शाळेत एका अज्ञात महिलेने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात ३ शाळकरी मुलांसह ६ जणांची हत्या झाली आहे. मात्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळीबार करणारी महिला ठार झाली आहे.

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरील जखमींना मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पंरतू यातील तीन विद्यार्थी आणि सात नागरिकांना त्यांनी मृत घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.