उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब! घरची लाईट गेल्याने त्यांने कॉल केला आणि..
28-Mar-2023
Total Views |
नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घराबाहेर बॉम्ब असल्याची माहिती देणारा कॉल दि.२७ मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास आला होता. मात्र पोलीस तपासात बॉम्ब असल्याची माहिती खोटी असल्याची बाब समोर आली आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच दि.२७ मार्च रोजीच रात्री घरावर बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. धमकी देणारी व्यक्ती कन्हान परिसरातील रहिवासी आहे. घरातील दिवे गेल्याने रागाच्या भरात आरोपींनी फोन बॉम्ब असल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रणाला दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.