बर्लिन : जर्मनीत विविध संघटनांचे २५ लाखांहून जास्त कर्मचारी संपावर आहेत. वाढत्या महागाईमुळे वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे रेल्वे आणि विमानसेवेसह अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. या संपामुळे बस आणि जलमार्गांवरही परिणाम झाला आहे. कामगार संघटना वेर्डी आणि ईव्हीजीच्या कामगार संघटनांनी संपाचे आवाहन केले आहे.