कोरोनामुळे केंद्र सरकार अलर्टवर! राज्यांसोबत होणार महत्वाची बैठक

    27-Mar-2023
Total Views |
 
covid update
 
 
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका वाढत असताना, केंद्र सरकारने युध्द पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक होणार आहे. केंद्र सर्व राज्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-१९ आढावा बैठक घेईल. १०-११एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात येणार आहे.
 
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. कशाप्रकारे माॅक ड्रील करायचं यासंदर्भात माहिती देण्यात येईल. भारतात दररोज एक हजारांहून अधिक रुग्णसंख्या आढळत आहे. सध्या महाराष्ट्र सर्वाधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या राज्यापैकी एक आहे.याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती.