दिल्ली-धर्मशाला पहिली इंडिगो विमानसेवा सुरू

    26-Mar-2023
Total Views |
civil-aviation-minister-and-information-and-broadcasting-minister-flagged-off-the-first-indigo-flight-from-delhi-to-dharamshala


नवी दिल्ली
: केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी रविवारी दिल्ली ते धर्मशाला या पहिल्या इंडिगो विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठ्या विमानतळाची मागणी करताना सांगितले की, “सध्या संपूर्ण भारतातून हिमाचलमध्ये येणार्‍या प्रवाशांना दिल्लीला जावे लागते आणि त्यानंतर राज्यातून जाणारे विमान घ्यावे लागते. मोठ्या विमानतळामुळे प्रवाशांना थेट अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल.” ते म्हणाले की, “धर्मशाला विमानतळ पाच जिल्ह्यांना जोडतो आणि त्याचा थेट फायदा राज्यातील निम्म्या लोकसंख्येला होतो. इंडिगोच्या सेवेने राज्याचा अर्धा भाग आणि पंजाबमधील काही ठिकाणे देशाच्या इतर भागांशी जोडण्याचा मोठा पल्ला गाठला आहे.”

 
केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, “नागरी विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या ६५ वर्षात जे साध्य झाले नाही ते गेल्या ९ वर्षात १४८ विमानतळ, वॉटर एरोड्रोम आणि हेलीपोर्ट बांधून साध्य झाले आहे. त्यांचे मंत्रालय पुढील तीन ते चार वर्षांत ही संख्या २०० पेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य घेऊन काम करत आहे.”
धर्मशाला विमानतळाच्या विस्तारासाठी अनुराग ठाकूर यांची विनंती स्वीकारली आहे. त्यांचे मंत्रालय त्यासाठी आधीच दोन टप्प्यांच्या योजनेवर काम करत आहे. पहिल्या टप्प्यात सध्याच्या धावपट्टीची लांबी १९०० मीटर करणे समाविष्ट आहे. दुसर्‍या टप्प्यात बोईंग ७३७ आणि एअरबस ए३२० विमान उतरवण्यास सक्षम असलेल्या विमानतळाची दृष्टी साकारण्यासाठी धावपट्टी ३११० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.(ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी उड्डयन मंत्री, भारत)