लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील विविध राज्यांतील नागरिकांमध्ये ‘भारताचे आवडते मुख्यमंत्री’ ठरले आहेत. ट्विटरवर ’'IndiaKeFavouriteCM’ या ‘हॅशटॅग’ने लोकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशाचे सर्वात आवडते मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे. या ‘ट्रेंड’मध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तराखंडमधील नागरिकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विकासासाठी आजवर घेतलेले सर्वांगीण निर्णय. म्हणूनच उत्तर प्रदेशच नव्हे, तर अन्य राज्यांतही त्यांना पसंती मिळताना दिसते.एवढेच नाही, तर जर्मनी, स्पेनमधील नागरिकांनीही योगींना ‘सर्वोत्तम मुख्यमंत्री’ म्हटले आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर विदेशातही योगींची लोकप्रियता या माध्यमातून दिसून येते.