नवी दिल्ली : शिवसेना संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांना हटविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे संसदीय नेतेपदी निवड झाल्याचे कळविले आहे. एकनाथ शिंदे आपल्या पत्रात म्हणतात, "शिवसेना पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली होती. ज्यात खासदार गजानन किर्तीकर यांना एकमताने संसदीय नेतेपदी निवडण्यात आले आहे.", एकनाथ शिंदेंनी हे पत्र केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडेही सुपूर्द केले आहे. दरम्यान, या घोषणेनंतर शिवसेनेतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत सत्कारही केला.