भारताशिवाय अमेरिकेची वाटचाल कठिण – द वॉल स्ट्रीट जर्नल

- भाजप जगातील सर्वांत महत्त्वाचा पक्ष असल्याची स्तुतीसुमने

    21-Mar-2023
Total Views | 97
 
The Wall Street Journal
 
 
नवी दिल्ली : एरवी भारतविरोधी मजकूरासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन वृत्तपत्रांपैकी द वॉल स्ट्रीट जर्नलने एका लेखात भारताशिवाय अमेरिकेची वाटचाल कठीण असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे भाजप हा जगातील सर्वांत महत्वाचा पक्ष असल्याचीही स्तुती करण्यात आली आहे.
 
अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने वॉल्टर रसेल मीड यांचा ‘इंडियाज बीजेपी इज द वर्ल्ड्स मोस्ट इम्पोर्टंट पार्टी’ नावाचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजप हा जगातील सर्वात महत्त्वाचा विदेशी राजकीय पक्ष आहे. 2014 आणि 2019 मध्ये सलग विजय मिळवल्यानंतर भाजप 2024 मध्ये पुन्हा विजयाकडे वाटचाल करत आहे. भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारताच्या ईशान्येकडील ख्रिश्चन बहुल राज्यांमध्ये भाजपला नुकतेच मोठे यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे २० कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातही शिया मुस्लिमांचा मोठा पाठिंबा असल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
 
भारताशिवाय अमेरिकेची वाटचाल कठीण असल्याचे मत लेखात व्यक्त करण्यात आले आहे. जपानसह हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेच्या रणनीतीमध्ये भारत एक मोठी आर्थिक शक्ती आणि महत्त्वाचा देश म्हणून उदयास येत आहे. यापुढे भारताच्या मदतीशिवाय अमेरिकेस चीनचा सामना करता येणार नसल्याचेही लेखात म्हटले आहे. त्याचवेळी भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असल्याचाही दावा करण्यास लेखक विसरलेला नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121