संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा वाटपातील अनियमिततेच्या संदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर ,पुणे आणि अकोला येथे शोध मोहीम राबवली आहे. झडतीदरम्यान विविध आरोप करणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ३ कंपन्यांनी गैरमार्गाचा वापर करून टेंडर भरल्या प्रकरणीही याआधी येथे छापेमारी करण्यात आली होती.