वर्गातील मुलांना बाहेर काढून शिक्षिका करायच्या ' हे ' कृत्य

    02-Mar-2023
Total Views |
notice-issued-by-ncpcr-on-the-matter-of-namaz-in-cm-rise-rashidiya-school-of-bhopal-mp


भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका सरकारी शाळेत नमाज पठणाची घटना घडून आली आहे. शाळेतील शिक्षिका शाळेतील विद्यार्थ्याना वर्गातून बाहेर काढून नमाज पठण करत असे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रोजचं घडते. दि.२८ फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.

भोपाळच्या जहांगीराबाद भागातील मॉडेल सीएम राइझ रशिदिया शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिका स्वत:ला नमाज पठण करता यांवे यासाठी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर हाकलवून लावत. पंरतू इतर कोणत्याच वर्गात असा प्रकार उघडकीस आलेला नाही. उलट शाळेत उर्वरित वर्गातील इतर शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे पाहायला मिळाले. पण जेव्हा नमाज पठण करणाऱ्या दोन शिक्षिकेचा व्हिडिओ बनवला गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तसेच धक्कादायक म्हणजे याच शाळेच्या आवारात शुक्रवारी मुलांना नमाजही शिकवला जातो.



१ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी ट्विट करत म्हणाले की, "मुलांच्या शिक्षणाचे मूलभूत काम थांबवून असे उपक्रम करू नयेत."तसेच प्रियांक कानूनगो यांनी त्या शिक्षिकांना नोटीस पाठवून संबंधित अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितले आहे. याआधी ही भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मध्यप्रदेश मधील केंद्रीय विद्यालयात नमाज पठण होत असल्याचे आरोप केले होते. तसेच केंद्रीय विद्यालयात एक बेकायदेशीर मशीदही बांधण्यात आली आहे जिथे बाहेरचे लोक नमाज अदा करण्यासाठी येतात, असे ही साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले होते.