जयपूर : लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी बुधवार, दि. १ मार्च रोजी लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. कुमार यांनी आज जयपूर स्थित सप्तशक्ती कमांडची सूत्रे हाती घेतली आहेत. लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार हे लष्कराच्या मुख्यालयात सैन्य उपप्रमुख (रणनीती) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अलीकडील नियुक्तींमध्ये गुप्तचर मोहिमा, दलांची रचना, ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान अशा विविध कामाचा अनुभव त्यांनी घेतला आहे. तसेच सुचिंद्र कुमार यांनी श्रीलंकेतील ‘दक्षिण आशियातील सहकारी सुरक्षा’ आणि इजिप्तमधील ‘युनायटेड नेशन्स सीनियर मिशन लीडर्स कोर्स’ हे अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत. त्यांनी लिहिलेले लष्करी शोधनिबंध अनेक व्यावसायिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.