मुंबई : ‘सस्मिरा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च संस्था’ ७२ वर्षांच्या सस्मिरा कुटुंबाशी सलंग्न आहे. सस्मिरा महाविद्यालयाअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून (सीएसआर कमिटी) ‘कर्तव्य’ हा महाविद्यालयीन उपक्रम राबवण्यात येत असतो. या उपक्रमाअंतर्गत गेले अनेक वर्ष एकही रुपयाच्या नफ्याची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त सामाजिक कल्याणासाठी राज्यातील अनेक ‘एनजीओं’ना मदत करत आहोत. लोकांमध्ये या उपक्रमाची जागरूकता आणखी वाढविण्यासाठी, कॉलेज प्रशासनान प्रयत्नशील आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची जागरूकता व्हावी आणि मदतीचा ओघ वाढावा, म्हणून शुक्रवार, दि. ३ मार्च रोजी ‘एनजीओ मेळा’ आयोजित करण्यात आला आहे. तरी या सर्व समाजहितासाठी राबवण्यात येणार्या कार्यक्रमांसाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.