नवी दिल्ली : ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी भूकंपाचा धक्का जाणवला. मणिपूरनंतर मेघालयमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. या भागात अवघ्या पाच तासांत भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला आहे.
मागील काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. तुर्की, चीन, नेपाळनंतर आज पहाटे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. दरम्यान, मणिपूरनंतर आता मेघालयमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
ताजिकिस्तानमध्ये ४.३ क्षमतेचा भूकंपाचा धक्का
नेपाळनंतर ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताजिकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे.