उद्यापासून दहावीची परिक्षा

    01-Mar-2023
Total Views |
10th exam from tomorrow


मुंबई
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात गुरुवार (दि. २ मार्च) पासून होत आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हजारो विद्यार्थी पेपर देणार आहेत. तसेच जर्मन, फ्रेंच या विषयांसाठी द्वितीय किंवा तृतीय भाषेची परीक्षाही उद्याच होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च असा या परीक्षेचा कालावधी आहे.