नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मध्य प्रदेश पोलिसांसोबत कारवाई करून संशयित दहशतवादी सरफराज मेमनला इंदौर येथून अटक केली. सरफराजवर २०१८ साली ‘पीएफआय’च्या संशयास्पद कारवायांत सहभागाचा आरोप आहे.
‘एनआयए’ने सोमवारी सरफराज मुंबईत असल्याबाबत इशारा जारी केला होता. त्यानंतर तो इंदौर येथे असल्याचे ‘एनआयए’ला समजले होते. त्यानंतर मंगळवारी इंदौरच्या ‘ग्रीन पार्क’ कॉलनीतून सरफराजला अटक करण्यात आली. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. सरफराज मेमन हा इंदौरच्या चंदन नगरचा रहिवासी आहे.