वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनच्या हेरगिरी करणार्या ‘बलून’चे अवशेष चीनला परत करण्यास नकार दिला आहे. हे ‘बलून’ दक्षिण कॅरोलिनालगतच्या अटलांटिक महासागरात अमेरिकेने पाडले होते. गेल्या आठवड्यात अनेक दिवस मोंटाना ते दक्षिण कॅरोलिनापर्यंत अमेरिकेच्या हवाई हद्दीत उडताना दिसलेल्या या चिनी ‘बलून’चे अवशेष गोळा करण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे.