बंगलोर : इलेक्ट्रिक वर चालणारी स्कुटर –मोटार, पुण्यामुंबईत चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस नंतर आता बाजारात इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रक अवतरला आहे. मोठ्या बांधकामाच्या ठीकाणी वापरला जाणारा धुर ओकणारा टिप्परच आता त्याच्या इलेक्ट्रिक अवतारात बाजारात दाखल होतोय. या बॅटरीवरच चालणाऱ्या टिप्परने बंगलोरच्या इंडिया एनर्जी वीक प्रदर्शनात भेट देणाऱ्या नागरिक आणि उद्योजक तसेच माध्यम प्रतिनिधींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली.
मेघा इंजिनीअरींगची उपकंपनी अर्थात ऑलेक्ट्रा ग्रिनटेक ही भारतात इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या प्रवासी बस गाड्या बनवण्यात आघाडीवर आहे. ऑलेक्ट्रानेच आता पायाभूत कंपन्याच्या उपयोगी पडणारा हा शक्तिशाली टिप्पर या प्रदर्शनात लोकासमोर आणला. याची लोकप्रियता येवढी होती की तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मेघा इंजिनीअरींगच्या स्टॉलवर सतत गर्दी होती. आणि यात सर्वसामान्यासोबत इंडस्ट्रिजमधील अनेक मान्यवर सुध्दा दिसले.
याबरोबरच मेघा इंजिनीअरींगच्या हायड्रोकार्बन्स विभागाने भारतीय ऑईल रिंग्ज तसेच ऑयकॉम या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या उपकंपनीने सैन्यासाठी बंकर्स , पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स, टेलिकॉम टॉवर्स, पोर्टेबल केबिन आणि प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग स्ट्रक्चर्स प्रदर्शनात मांडल्या होत्या. नैसर्गिक गॅस पुरवणाऱ्या मेघा गॅस बरोबरच मेघा इंजिनीअरींगने ताब्यात घेतलेल्या परदेशी कंपन्या ड्रिलमेक इंटरनॅशनल, पेट्रेव्हन एसपीए यांची नैसर्गिक इंधनाच्या क्षेत्रातील अनेक उत्पादने प्रदर्शनात पहायला मिळाली.