परळ श्री’मध्ये रसल दिब्रिटोने मारली बाजी

    28-Feb-2023
Total Views |
russel-debreto-wins-parel-shree-competition

मुंबई : ‘किंग मास क्लासिक’ आयोजित ‘परळ श्री २०२३’मध्ये रोहन गुरव आणि सुदर्शन खेडेकरला मागे टाकत बॉडी वर्कशॉपच्या रसल दिब्रिटोने बाजी मारली. तसेच, प्रथमच आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आर. के. फिटनेसची हर्षदा पवार विजेती ठरली, तर ‘मेन्स फिजिक’ प्रकारात दांडेश्वर जिमचा ओमकार पिंगे अव्वल ठरला. शरीरसौष्ठवपटूंचा मार्गदर्शक असणार्‍या मनीष आडविलकर यांनी ‘परळ श्री’ स्पर्धेचे आयोजन परळच्या नरेपार्क मैदानात केले होते. क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी आणि गोपाळ मंत्री यांच्यावतीने ‘रॉयल एनफिल्ड’ आणि ‘सुझुकी बर्गमन’ या दुचाकी विजेत्यांना देऊन सन्मानित करण्यात आले.