मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात ६५६ पदांकरिता भरती

    28-Feb-2023
Total Views |
recruitment-for-656-posts-begin-under-health-department-of-mumbai-municipal-corporation


मुंबई
: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख मंगळवार, दि. २१ मार्च आहे. तसेच, परिचारिका पदासाठी ३५ हजार, ४०० प्रतिमहिना इतके वेतन मिळणार आहे.

अर्जाची पद्धत

परिचारिका पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरातीसोबत अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, प्रभाग नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार पदासाठी ४ जागा

परिचारिकेबरोबरच आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय येथे विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार आणि विशेषज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण चार जागा रिक्त आहेत. या जागांसाठीदेखील अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पात्र उमेदावारांनी वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च आहे.

शैक्षणिक पात्रता

विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागारासाठी भूलशास्त्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बालरोग शास्त्रातील ‘एमडी’, ‘डीएनबी’, ‘डीसीएच’ पदवी विशेषज्ञ डॉक्टर पदासाठी उमेदवारने हृदयरोग शास्त्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, फेलोशिप प्राप्त केलेली असणे आवश्यक किंवा मज्जासंस्था शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी, फेलोशीप घेतली असणे किंवा त्वचारोग शास्त्रातील ‘एमडी ‘डर्म्याटोलॉजी’ पदवी अनिवार्य