मनीष सिसोदिया यांना राऊज एव्हॅन्यू कोर्टात हजर करणार!

    27-Feb-2023
Total Views |
 
Manish Sisodia Arrested
 
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. काल त्यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. अशातच ईडी आणि सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. काल आठ तास ही चौकशी सुरु होती.
 
 
 
दरम्यान, आज सिसोदिया यांना राऊज एव्हॅन्यू कोर्टात हजर करणार असल्याचे समजते आहे. सीबीआय मनीष सिसोदिया यांना कोर्टात हजर करेल. सिसोदिया यांनी मद्य घोटाळ्यात गुन्हेगारी कट रचला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप CBI ने केला आहे. रविवारी दि. २६ रात्री अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण रात्र सिसोदियांना CBI मुख्यालयातच ठेवण्यात आले. त्यामुळे आपनेते मनीष सिसोदिया यांना सीबीआय मुख्यालयातच संपूर्ण रात्र काढली लागली.
 
 
 
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, "आम आदमी पार्टीला चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. याची स्क्रिप्ट भाजपच्या मुख्यालयात लिहिली गेली असून, तपास यंत्रणा भाजपचे एक युनिट म्हणून काम करत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टी आज देशभरात निदर्शने करणार आहे."दिल्लीतील भाजप मुख्यालयात देखील सिसोदिया यांच्या अटकेविरोधी निदर्शने करण्यात येणार असल्याचे आपने म्हटले आहे.