८.३६ कोटींचे विदेश चलन जप्त

    23-Feb-2023
Total Views |
 
foreign currency
 
मुंबई : २० फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून सुमारे ८.३६ कोटी भारतीय रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. तसेच भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाकडून अमेरिकन डॉलर हे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी दरम्यान जप्त करण्यात आले आहे.
 
आरोपीने परकीय चलन तपासणीत उघड होऊ नये म्हणून एका हँडबॅगमध्ये अतिशय बारकाईने लपवून ठेवले होते. परंतु सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान हे चलन जप्त केले आहे. आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून तपास अधिकारी प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.