मी बोललो तर अनेकांची अडचण होईल : मुख्यमंत्र्यांचा इशारा

    23-Feb-2023
Total Views | 93
 
Eknath Shinde
 
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. "मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही. त्यावर काही बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल. आम्हाला संपत्ती चा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती." असं शिंदे म्हणाले.
 
एमपीएससीच्या प्रश्नावर बोलताना ते पुढे म्हणाले, "आम्ही तोडगा काढतोय. आम्ही मुलांनीही बोललो आहे. दुपारी बोलताना MPSC विषय सुरू असताना निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने निघाले आहे. सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळं असे चुकून म्हटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता काही लोकांना निवडणूक आयोगाची अॅलर्जी झाली आहे. त्यातून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आम्ही प्रश्न सोडवतो एमपीएससी प्रश्नावर राजकारण सुरु आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही प्रश्न सोडवणारे आहोत." असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121